कमरेवर हाथ ठेऊन उभा राहिलेला ‘विठ्ठल’, सचित तर नव्हे ?

564

‘विठ्ठल’ हा नवा कोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मिडीयावर उलगडला. देव राजगुरु फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत तयार होणा-या ‘विठ्ठल’ चित्रपटाचे दिग्दर्शन राजीव रुईया यांनी केले आहे.

“कमरेवर हाथ ठेऊन काय उभा राहिलो, दुर्बल समजायला लागले”, असे वक्तव्य करणा-या पोस्टरवरील तो अभिनेता कोण असेल याचा अनेकजण विचार करत असतील. तर आम्हाला असं वाटतंय की या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कमरेवर हाथ ठेऊन उभा राहिलेला विठ्ठल म्हणजेच या चित्रपटाचा नायक अभिनेता सचित पाटील आहे.

दशरथ सिंह राठोड, उमेद सिंह राजपुरोहित आणि जगदीश राम झाकड निर्मित आणि अरुण त्यागी, सन्नी खन्ना सहनिर्मित ‘विठ्ठल’ या चित्रपटाविषयीची अधिकची माहिती लवकरच प्रेक्षकांना कळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here