जाणून घ्या संतोष जुवेकरच्या आगामी मराठी चित्रपटाविषयी !

444

मराठी सिनेसृष्टीतील अॅक्शन आणि रोमॅण्टिक हिरो संतोष जुवेकने विविध सिनेमे आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘बेधूंद मनाची लहर’, ह्या ‘गोजिरवाण्या घरात’, ‘किमयागार’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांमधून त्याने आपली विशेष छाप पाडली. ‘मोरया’, ‘मॅटर’, ‘पांगिरा’, ‘एक तारा’, ‘खेळ मांडला’, ‘सनई चौघडे’, ‘बाईकर्स अड्डा’, ‘झेंडा’ हे संतोषचे सिनेमे लोकप्रिय ठरले. आता लवकरच त्याचा एक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि विशेष म्हणजे संतोष मराठी दिग्गज कलाकारांसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. आणि त्याच्या या आगामी मराठी चित्रपटाचे नाव आहे ‘शिवाजी पार्क मुंबई २८’.संतोष जुवेकरने नुकतेच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची कल्पना प्रेक्षकांना दिली आहे आणि तसेच विक्रम गोखले, सतीश आळेकर, शिवाजी साटम, महेश मांजरेकर आणि अशोक सराफ यांच्यासोबतचे फोटोस् देखील त्याच्या पोस्टमध्ये आपण पाहू शकतो.

दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतीश आळेकर, शिवाजी साटम हे दिग्गज कलावंत ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. सोबत शरद पोंक्षे, उदय टिकेकर, सविता मालपेकर, सुहास जोशी आणि भारती आचरेकर हे ज्येष्ठ कलावंत सुद्धा या चित्रपटात आहेत. त्यामुळे ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ हा चित्रपट म्हणजे जणू मराठीतील दिग्ग्ज कलाकारांना एकाच वेळी चंदेरी पडद्यावर पाहण्याची पर्वणीच ठरणार आहे. संतोष जुवेकरसह, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस हे आजच्या पिढीतील तरुण कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.

महेश वामन मांजरेकर प्रस्तुत व गौरी पिक्चर्स निर्मित ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन करीत असून, मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नेहमीच विविधांगी विषयांवर आधारित असलेल्या चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन करणारे महेश मांजरेकर ‘शिवाजी पार्क मुंबई २८’ या चित्रपटाचे  दिग्दर्शन करीत आहेत.


Like Us on Facebook- Marathi Film News

Follow us on Instagram- Marathi Film News

Follow us on Twitter- Marathi Film News

Subscribe Our Channel on YouTube- Marathi Film News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here