रितेश देशमुखच्या ‘फ’च्या बाराखडीचा व्हिडीयो पाहा !

607

काही दिवसांपासून सोशल मिडीयावर ‘फ’च्या बाराखडीचा व्हिडीयो व्हायरल होत आहे. मराठी सिनेसृष्टीतील कलाकार ‘फ’ची बाराखडी का म्हणत आहेत आणि ‘फ’च्या बाराखडीत लपलंय आगामी मराठी चित्रपटाचे नाव जे आतापर्यंत सर्वांना ठाऊक झालंय. एकंदरीत हा एक प्रमोशनचा भाग आहे.

#FaFe लवकरच येतोय हे सांगण्यासाठी मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने पण ‘फ’च्या बाराखडीचा व्हिडीयो सोशल मिडीयावर शेअर केलाय-

‪'फ' ची बाराखडी. #Fafe…. तुम्ही पण try करून पोस्ट करा. ‬‪Mumbai Film Company #ZeeStudios टाॅक्क!!‬

Posted by Riteish Deshmukh on Tuesday, September 5, 2017

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि क्षितीज पटवर्धन लिखित ‘फास्टर फेणे’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री पर्ण पेठे ही जोडी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट भा.रा.भागवत यांच्या ‘फास्टर फेणे’ या पुस्तकावर आधारित आहे.

झी स्टुडियोज आणि मुंबई फिल्म कंपनी यांचा मनोरंजनाची खुसखुशीत मेजवाणी असलेला ‘फास्टर फेणे’ येत्या २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय.

 

 


Like Us on Facebook- Marathi Film News

Follow us on Instagram- Marathi Film News

Follow us on Twitter- Marathi Film News

Subscribe Our Channel on YouTube- Marathi Film News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here