लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले लग्न !

134

होय, मराठी मनोरंजनसृष्टीतील हुशार अभिनेत्री आणि हसमुख परी प्राजक्ता हनमघर नुकतीच रजत धळे याच्यासोबत विवाहबध्द झाली आहे. १४ ऑगस्टला अगदी साध्या आणि सुंदर पध्दतीत हे शुभमंगल पार पडले. खास मित्र-मैत्रिणींच्या आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला असून ही नवविवाहित जोडी त्यांच्या आयुष्यातील सुंदर प्रवास अनुभवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

लाफ्टर क्वीनचे हास्य तिच्या लग्नांच्या फोटोसमध्ये पण पाहू शकतो. मराठमोळ्या पेहरावात प्राजक्ताचे सौंदर्य अजून खुलले आहे.

एका लग्नाची दुसरी गोष्ट, फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, ढाबळ, कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस या टेलिव्हिजन मालिका आणि कार्यक्रमांतून प्राजक्ताने नेहमीच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.  विनोदी कार्यक्रमात प्राजक्ताच्या बहारदार परफॉर्मन्समुळे चार चाँद लागतात.  अशी ही हसमुख प्राजक्ता नेहमी हसत राहावी, आनंदी राहावी आणि आम्हां प्रेक्षकांना हसवत राहावी.

फोटो पाहण्यासाठी फोटो वर क्लिक करा

प्राजक्ता हनमघर व रजत धळेला लग्नानिमित्त आणि पुढील यशस्वी वाटचालीकरता Marathi Film News तर्फे हार्दिक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here