‘लागिरं झालं जी’ मालिकेमध्ये साजरा होणार ‘कारगिल विजय दिवस’

274

‘लागिरं झालं जी’ मालिकेमध्ये साजरा होणार ‘कारगिल विजय दिवस’

‘लागिरं झालं जी’ मालिकेमध्ये साजरा होणार ‘कारगिल विजय दिवस’

26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्यामध्ये सामिल होऊन देशसेवा करण्याची ओढ असलेल्या तीन तरुणांची गोष्ट झी मराठीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत दाखवण्यात येत आहे.

सध्या ही मालिका प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय आहे. कारगिल विजय दिवसच्या निमित्ताने याही मालिकेत हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या विजयासाठी आपल्या प्राणाची आहुती देणा-या शहिद सैनिकांना मानवंदनाही देण्यात येणार आहे.

या मालिकेत हणमंत फौजी यांनी कारगिल युद्धामध्ये लढताना हात गमावल्याने इंफन्ट्रीकडून कारगिल विजय दिवशी त्यांच्या शौर्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यासाठी त्यांना बोलावलं जातं. हणमंत त्यांच्यासोबत अजिंक्यलाही घेऊन जातात.ट्रेनिंग सेंटरचं वातावरण पाहून अजिंक्य भारावून जातो. कारगिलमध्ये शहिद झालेल्या जवानांना यावेळी आदरांजली वाहिली जाते. ‘लागिरं झालं जी’ मालिकेमध्ये येत्या 26 आणि 27 जुलैला म्हणजेच येत्या बुधवार आणि गुरुवारच्या भागात हा कारगिल विजय दिवस बघता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here