Bahubali in Chala Hawa Yeu Dya

216

Bahubali in Chala Hawa Yeu Dya

Bahubali in Chala Hawa Yeu Dya

Bahubali in Chala Hawa Yeu Dya

चला हवा येऊ द्याच्या मंचावर प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीत आजवर सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘बाहुबली २’ या चित्रपटाचं मराठमोळे रूप.

बाहुबली हा चित्रपट जेवढा लोकप्रिय ठरला त्यापेक्षाही जास्त चर्चिला गेला याचा पुढचा भाग असलेला बाहुबली २ हा चित्रपट.

‘बाहुबली’ या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक नवनवे विक्रम रचले.

अजूनही अनेक चित्रपटगृहात ‘बाहुबली २’ ला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोच आहे.

व्हिएफएक्स तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि डोळे दिपवणारी साहसदृष्ये ही या चित्रपटाची खास वैशिष्ट्ये ठरली.

बाहुबली २ ची ही लोकप्रियता बघता थुकरटवाडीकरांनीही मग प्रेरणा घेत ‘भाऊबली’ हा चित्रपट बनवला.

बाहुबली २ सारख्या कल्पेनेपलिकडच्या चित्रपटाला आपल्या स्किटमध्ये उतरवणं ही कल्पनाही तेवढीच भन्नाट आहे. त्यामुळेच थुकरटवाडीकरांचा हा भाऊबली ‘चला हवा येऊ द्या’ च्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

ज्यात भाऊबलीच्या मुख्य भूमिकेत भाऊ कदम, देवसेनेच्या भूमिकेत श्रेया बुगडे, भल्लाळदेवच्या भूमिकेत अंकुर, शिवगामीच्या भूमिकेत सागर कारंडे तिचा पती बिजालदेवच्या भूमिकेत भारत गणेशपुरे आणि कटप्पाच्या भूमिकेत कुशल बद्रिके बघायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ज्याप्रमाणे चित्रपटात ज्याप्रमाणे स्पेशल इफेक्ट्सचा खास वापर करण्यात आलाय तसाच वापर इथेही दिसणार आहे आणि त्याच्या सोबतीला असेल विनोदाचा जबरदस्त तडका.

Like Us on Facebook- Marathi Film News

Follow us on Instagram- Marathi Film News

Follow us on Twitter- Marathi Film News

Subscribe Our Channel on YouTube- Marathi Film News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here