Movie Review Bhikari

1666

Movie Review Bhikari

Movie Review Bhikari

Movie Review Bhikari

‘आज मेरे पास पैसा है, बंगला है, गाडी है… तुम्हारे पास क्या है?’ असा प्रश्न काही वर्षांपूर्वी चोर-उचक्का असलेल्या एका भावाने दुसऱ्या भावाला विचारला होता. तेव्हा स्वाभिमानी पोलिस इन्स्पेक्टर असलेला दुसरा भाऊ म्हणाला होता- ‘मेरे पास मा है…’ म्हणजे दुनियतेली सगळी संपत्ती एका बाजूला आणि आई दुसऱ्या बाजूला. आईचं मोल कशातच होऊ शकत नाही, हेच हा डायलॉग एकप्रकारे सूचित करतो. याचाच अर्थ जवळ कितीही संपत्ती असली आणि आई नसेल, तर ती व्यक्ती भिकारी असते. भावनिक दृष्ट्या हे योग्यच आहे. परंतु कुणी आईसाठीच मुद्दाम भिकारी झाला तर…! आईचा जीव वाचावा म्हणून श्रीमंतीची झूल उतरवून कुणी प्रत्यक्षात रस्त्यावरचा भिकारी झाला तर!!

… त्यामुळे त्याच्या आईचा जीव कसा वाचेल, याचं काहीच सायंटिफिक उत्तर नाही. परंतु तुमच्याकडे नसलं तरी ते ‘भिकारी’ या सिनेमाच्या लेखक-दिग्दर्शकाकडे मात्र नक्की आहे. कारण सिनेमाच्या दुनियेत बुद्धीपेक्षा, सगळ्यात जास्त भावना विकल्या जातात, हे त्यांना पक्कं ठाऊक आहे आणि त्या एन्कॅश करण्याचा प्रयत्न ‘भिकारी’ चित्रपटात पुरेपूर करण्यात आला आहे. केवळ भावनाच नाही, सफाईदार हाणामारीपासून सफाईदार तंत्रापर्यंत मराठी सिनेमाला आजवर नवं असलेलं बरंच काही ‘भिकारी’ सिनेमात आहे. कारण तो साऊथचाच रिमेक (मूळ सिनेमा पिचाइक्करण) आहे, जरी मराठीत त्याला स्वतंत्र अंगडंटोपडं चढवलं असलं तरी! त्यामुळे मनोरंजनाचा मसाला यात भरपूर आहे.

शारदा जयकर (कीर्ती आडारकर) यांनी पतीच्या पश्चात स्वकष्टाने मिलची उभारणी केलेली असते. त्यांचा मुलगा सम्राट जयकर (स्वप्नील जोशी) परदेशातून शिकून आल्यावर त्या सगळा कारभार त्याच्या हातात सोपवतात. मात्र एके दिवशी त्याच्याबरोबर मिलमध्ये गेलेल्या असताना त्यांना अपघात होतो आणि त्या कोमात जातात. त्यानंतर तब्बल आठ महिने त्यांच्यावर उपचार होतात ( पहिले चार महिने इस्पितळात आणि उर्वरित आयुर्वेदोपचार केंद्रात), परंतु काहीच यश येत नाही. सम्राट नैराश्याने ग्रासलेला असतानाच एक साधुमहाराज (माधव अभ्यंकर) त्याला रस्त्यात भेटतात. त्याच्या चिंतेचं कारण जाणल्यावर ते सम्राटला म्हणतात- आतापर्यंत तू जो आईसाठी खर्च केलास, तो सारं तिनेच कमावलेलं होतं. तुझ्याकडे काय आहे? जे तू ते तिला देऊ शकतोस? नाव-संपत्ती सगळं मागे टाकून तू तिच्यासाठी भीक मागू शकतोस? भिकारी होऊ शकतोस?’ कारण आईविनातर सगळेच भिकारी असतात. आईसाठी कुणी‌ भिकारी होईल?

… आणि सम्राट आईसाठी सगळ्याचा त्याग करतो. रस्त्यावरचा भिकारी होतो. तो तब्बल ४८ दिवस (एवढेच दिवस का ते ठाऊक नाही) भिकारी म्हणून खरोखरच्या भिकाऱ्यांबरोबर राहतो. या दिवसात त्याच्या आईची तब्येत दिवसेंदिवस खालावतच जाते… मात्र तो बरोब्बर ४८ दिवसांनी घरी जातो आणि… पुढे काय? तर तो मेलोड्रामा आपण पडद्यावरच पाहायला हवा. शिवाय सम्राट भिकारी म्हणून वावरत असतानाच त्याची नि मधुची (रुचा इनामदार) फुललेली लव्हस्टोरी, तसंच विश्वनाथ (सयाजी ‌शिंदे) आणि बसप्पा (मिलिंद शिंदे)ची क्राइमस्टोरीही सोबतीला आहे. त्यामुळे सिनेमा डोक्याला पटला नाही, तरी फुल्ल एन्टरटेन्मेंट आहे.

सिनेमातल्या कलाकारांनी ठाकठीक काम केलं आहे. स्वप्नीलने प्रयत्न चांगला केला आहे, परंतु तो भिकारी वाटत नाही. त्याला ज्या भिकाऱ्यांनी साथ दिलीय, ते नारायण जाधव, कैलाश वाघमारे, शुभांगी भुजबळ, विद्या पटवर्धन मात्र मस्तच. सयाजी शिंदे आणि मिलिंद शिंदेही त्यांच्या नेहमीच्या इभ्रतीत काम करतात.

साऊथची कॉपी असल्यामुळे सिनेमात गाण्यांची गर्दी आहे. त्यांची लोकेशन्स आणि टेक्निक चांगलं आहे, परंतु अतिरेक आहे. हाईट्ट म्हणजे सिनेमा संपल्यावर प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी आपली नाचण्याची आणि कोरियोग्राफीची हौस भागवून घेतली आहे.


Like Us on Facebook- Marathi Film News

Follow us on Instagram- Marathi Film News

Follow us on Twitter- Marathi Film News

Subscribe Our Channel on YouTube- Marathi Film News

REVIEW OVERVIEW
Movie Review Bhikari
SHARE
Previous articleSai Tamhankar will appear in the south film
Next articleAgnipankh- An action thriller about firemen

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here