Movie Review Bus Stop

197

Movie Review Bus Stop

Movie Review Bus Stop

दोन पिढ्यांतील जे सामंजस्य आहे ते कसे साधले जावे यावर भाष्य करणारा चित्रपट म्हणजे बसस्टॉप.
कथा : पूजा सावंत आणि अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ चांदेकर आणि अमृता खानविलकर, सुयोग गोऱ्हे आणि रसिका सुनील यांच्या कॉलेज जीवनातील प्रेम प्रकरणे, एकमेकांमधील मैत्री आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या पालकांची मानसिकता चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटात ज्या जोड्या आहेत त्यापैकी किती जणांचे प्रेम सफल होते? आधीची पिढी व युवा पिढी यांच्यामध्ये जी जनरेशन गॅप आहे ती दरी कमी करण्यासाठी पालक व त्यांची मुले पुढाकार घेतात का? या दोन पिढ्या खरच एकमेकांना समजून घेण्यात यशस्वी होतात का? असे काही प्रश्न निर्माण होतात. त्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
अभिनय : बसस्टॉप चित्रपटामध्ये मराठीतील अनेक दिग्गज कलाकार आहेत. त्यात अमृता खानविलकर (शरयू), अनिकेत विश्वासराव ( देवेन), हेमंत ढोमे- (किशोर), सिद्धार्थ चांदेकर (विनीत), पूजा सावंत (अनुष्का) ,रसिका सुनील (मैथिली), अक्षय वाघमारे (अभिषेक), सुयोग गोरे ( सुमेध), अविनाश नारकर ( गोविंद – मैथिलीचे वडील), संजय मोने (जितूभाई), शरद पोंक्षे (आबा -किशोरचे वडील), उदय टिकेकर (मेघराज – शरयूचे वडील), विद्याधर जोशी (सतीश – अनुष्काचे वडील) यांनी आपली भूमिका चोख पार पाडली आहे. चित्रपटातील व्यक्तिरेखांना आधुनिकतेचा स्पर्श देण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी ठरत नाही. पालकांची भूमिका साकारणारे अविनाथ नारकर, शरद पोंक्षे, उदय टिकेकर आणि विद्याधर जोशी यांचे अभिनय मात्र चित्रपटाशी आपल्याला जोडून ठेवते.
दिग्दर्शन : या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत समीर हेमंत जोशी. दोन पिढ्यांतील गॅपची गोष्ट सांगताना, ती गॅप मिटवण्यासाठीच्या प्रयत्नांचे चित्रण दाखविताना हा चित्रपट दिग्दर्शकाच्या हातून निसटला आहे. खूप तरुण कलाकार असले म्हणजे चित्रपट प्रसन्न व युथफूल होतोच असे नाही. प्रश्न उभे करुन त्याची उत्तरे शोधता शोधता हा चित्रपटच कथानकाच्या गुंत्यात अडकून प्रेक्षकांसमोर एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतो.
संगीत :या चित्रपटातील गाणी युथफुल आहे. श्रेय हृषिकेश, सौरभ-जसराज आणि आदित्य बेडेकर या नव्या दमाच्या संगीतकारानी हि जबाबदारी उचलेली आहे . ‘रोमान्स’, `घोका नाही तर होईल धोका’ आणि `तुझ्या सावलीला’ ही गाणी तरुणाईला भुरळ घालणारी आहेत. हृषिकेश-सौरभ-जसराज या त्रिकुटाने संगीतबद्ध केलेले `मूव्ह ऑन’ हे गाणे वैभव जोशी यांनी लिहिले असून रोहित राऊत आणि प्रियांका बर्वे या जोडीने ते गायले आहे.

REVIEW OVERVIEW
Movie Review Bus Stop
SHARE
Previous articleUndga Marathi Movie Release Date
Next articleRomantic Song from Bhikari Movie

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here