Deva Ho Deva Bhikari Swwapnil Joshi Sukhwinder Singh & Divya Kumar

172

Deva Ho Deva Bhikari Swwapnil Joshi Sukhwinder Singh & Divya Kumar

Deva Ho Deva Bhikari Swwapnil Joshi Sukhwinder Singh

& Divya Kumar

‘देवा हो देवा’ असे या गाण्याचे बोल असून सुखविंदर सिंग आणि दिव्या कुमार यांनी हे गायलं आहे. मिलिंद वानखेडे यांनी संगीत दिलंय तर गाण्याचे बोल विक्की नगर आणि प्रसन्न देशमुख यांनी लिहिले आहेत. गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला असून या पार्श्वभूमीवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या ‘भिकारी’ सिनेमातील पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. गणेश आचार्य यांचा दिग्दर्शक हा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता मोठी वाढली आहे. त्यात या सिनेमाच्या पोस्टरचं बॉलिवूड कलाकारांनीही कौतुक केल्याने सिनेमाची हवा जोरात आहे.

याआधी या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. त्यात स्वप्नील जोशी हा गणेशाच्या मूर्ती शेजारी झोपलेला दाखवण्यात आला आहे. आता हे श्रीगणेशाचं गाणं रिलीज करण्यात आलंय. आणि सिनेमाचं टायटल ‘भीकारी’ असं आहे. त्यामुळे या सिनेमाची कथा काय असेल याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

या सिनेमात स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार, गुरू ठाकूर, किर्ती अडारकर आणि मिलिंद शिंदे यांच्या भूमिका आहेत. गणेश आचार्य आणि शरद शेलार यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. स्वप्नील जोशी ब-याच दिवसांनी सिनेमा घेऊन येत आहे. त्यामुळे त्याची यातील भूमिका काय असेल याकडेही त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Like Us on Facebook- Marathi Film News

Follow us on Instagram- Marathi Film News

Follow us on Twitter- Marathi Film News

Subscribe Our Channel on YouTube- Marathi Film News

Deva Ho Deva Bhikari Movie Song

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here